Thursday, October 22, 2026
Homeचंद्रपूरसरपंच निवड प्रकरणी तहसीलदार निलंबित...

सरपंच निवड प्रकरणी तहसीलदार निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच दोन सदस्यांना अपात्र ठरविले होते.अपात्र ठरविल्याने अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच कोरपना तालुक्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी नवीन सरपंच निवडीसाठी सभा घेऊन सरपंच निवड केल्याने राज्य शासनाने तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.सदरचा प्रकार कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथील असून यासंदर्भात उपसरपंच डॉ.विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेऊन निलंबनाचा आदेश जारी केला.कढोली खुर्दचे उपसरपंच डॉ.विनायक डोहे यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत कढोली खुर्दच्या सरपंच निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सीता पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ ऑगस्ट २०२४ रोजी अपात्र ठरविण्यात आले होते.या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त,नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्यासह संबंधित सर्वांना देण्यात आले होते.मात्र,तहसीलदार व्हटकर यांनी १९ ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता २६ ऑगस्ट २०२४ रोजी सभा घेतली. काँग्रेस समर्थक उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली.अपिलाची मुदत पंधरा दिवस म्हणजे २७ ऑगस्टपर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेतली.तहसीलदार व्हटकर यांनी एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार झाली होती.राज्य सरकारने दखल घेऊन तहसीलदारांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!