- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील एक मोठा खेळाडू निर्माण व्हावा; यासाठी देसाईगंज शहराच्या क्रीडा संकुलन या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय क्रीडा संम्मेलन आयोजित करण्यात आले होते.
सदर क्रीडा संम्मेलन नुकतेच पार पडले असून
स्पर्धेत देसाईगंजच्या डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
क्रीडा संम्मेलन स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींमध्ये पूर्वी प्रशांत सूर्यवंशी इयत्ता ७ व्या वर्गातील विद्यार्थिनीने थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक,१४ वर्षाखालील मुलांमध्ये तरंनजीतसिंग चावला इयत्ता ८ व्या वर्गातील विद्यार्थ्याने थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर राजवीर सिंग चावला इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याने १७ वर्षाखालील ४०० मीटर हर्डल्स रन धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक पटकावलेला आहे.
या यशाबद्दल तालुका क्रीडा संकुलनचे मंगेश गुरुफुले, संस्थेचे अध्यक्ष प्रा.बी.पी.पडवेकर,मुख्यध्यापक पंकज डी मेश्राम,क्रीडाशिक्षक विजय मुळे तसेच सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -

