- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरमोरी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.शेतकरी,युवक,महिला,व्यापारी,विद्यार्थी व इतर अशा अनेकांच्या विविध समस्या,प्रश्न ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली असून कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जिवन नाट यांच्या नेतृत्वात,तालुका काँग्रेस कमिटी कोरचीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, महीला तालुकाध्यक्ष कुरखेडाचे आशाताई तुलावी, माजी तालुका अध्यक्ष कुरखेडाचे जयंत हरडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी,पं.स.कुरखेडाचे माजी सभापती गिरधर तीतराम यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा,खेडेगाव व परिसरातील गावांमध्ये काल,२८ सप्टेंबरला पार पडली असून आज,रविवार २९ सप्टेंबरला अंगारा,नवेझरी,फरी, कसारी,चरवीदंड, खोब्रामेंढा,बदबदा,कसारबोडी, मालेवाडा, कातलवाडा, राणवाही,दमेस व परिसरातील गावांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.काल शनिवारी झालेल्या जनसंवाद परिवर्तन यात्रेमध्ये खेडेगाव,गेवर्धा या गावाला भेट देण्यात आली.या ठिकाणी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती.सभेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी उपस्थितांशी जनसंवादाद्वारे समस्या जाणून आणि त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार केला.
- Advertisement -

