- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-
कोणीही शेतकऱ्यांना
आता कमी लेखू नका
तो जगाचा आहे पोशिंदा
हे तुम्ही विसरू नका
शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. तो दिवसरात्र कष्ट करून स्वतः उपासमारी सोसून अख्ख्या जगाला पोसतो.पण तुम्ही विचार करा जगाचा पोशिंदा आहे का सुखी? त्याच्या मालाला हमीभाव आहे का? तो सर्वांचा वाली आहे.पण त्याचे कुणी वाली आहे का? शासन शेतकऱ्यांना योग्य तो भाव देत नाही.
कितीही कष्ट केले तरी
नाही शेतपिकांना भाव
खरंच शेतकरी सुखी का
आता तुम्हीच सांगा राव
आपण बघतो,एखाद्या ऑफिस मध्ये शेतकरी गेलं कि त्याला उभाच ठेवल्या जाते.आणि एखादा कर्मचारी गेलं तर त्याला चाय,पाण्याच्या विचारल्या जाते.त्याला बसायला खुर्ची दिली जाते.पण माझ्या जगाच्या पोशिंद्याला बसायला खुर्ची पण दिली जात नाही. इतकं फरक का? हे कुठेतरी थांबले पाहिजे.शेतकरी जरी फाटके कपडे घालत असेल तरी ही त्याच्या मनगटात संपूर्ण जगाला पोसण्याची ताकद आहे.ही सर्वांना जाणीव असली पाहिजे.शेतकरीच आपला माय बाप तोच शेती पिकवणार नाही तर आपण खाणार तरी काय? हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे.शासनाने शेतकऱ्याला योग्य तो भाव दिला पाहिजे.शासन जर शेतकऱ्याला योग्य तो भाव देईल आणि माझ्या शेतकरी राजा कडे लक्ष देईल तर शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही.शेतकरी आत्महत्या थांबेल.
कर्जबाजारी होऊन
जेव्हा शेतकरी मरतो
तेव्हा शासन का बरं
निद्राअवस्थेत असतो
काबाड कष्ट करून
तो उपासमारी सोसतो
तरी शेतकरी राजा
अख्ख्या जगाला पोसतो
(कवी- अजय राऊत,रा.कवठी, ता.सावली,जि.चंद्रपूर)
- Advertisement -

