Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरशेतातील लांबा,गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलांना विद्युत तारेचा शॉक... - एका महिलेचा मृत्यू...

शेतातील लांबा,गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलांना विद्युत तारेचा शॉक… – एका महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विद्युत तारेचा शॉक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरी महिला गंभीर झाल्याची घटना आज,शनिवार दिनांक-१९ ऑक्टोंबर सकाळच्या सुमारास चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेत शिवारात घडली.सुंदराबाई चौधरी वय ६५ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.तर कमलाबाई नन्नवरे वय ६० वर्षे असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ताराबाई घुघुस्कर यांनी आपल्या शेतातील लांबा व गवत कापण्यासाठी दोन महिलांना मजुरीने बोलविले होते.त्यांनी शेतात वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून पिकांच्या रक्षणासाठी ताराचे कंपाऊंड केले होते.रात्रीच्या वेळी त्यावर विद्युत प्रवाह चालू ठेवला होता.आज शनिवारी सकाळी विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरल्याने विद्युत प्रवाह सुरूच राहिला.दोन महिला मजुरांनी शेतात प्रवेश करताच त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला.यामध्ये सुंदराबाई चौधरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर कमलाबाई नन्नवरे ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!