Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तफोन पे' प्रकरणी संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस... - आचारसंहिता भंग केल्याचा...

फोन पे’ प्रकरणी संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस… – आचारसंहिता भंग केल्याचा आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शिवसेनेचे(शिंदे गट)आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे.बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी,त्यांना सांगा गाड्या करा,गाड्यांसाठी जे काही लागते ते त्यांना फोन पे करतो, त्यांना सांगा येण्या-जाण्याचा जे काही लागते ते आम्हाला सांगा,असे आर्थिक प्रलोभन देणारे वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात हे विधान केले आहे.
आमदार संतोष बांगर हे येत्या २४ तारखेला आपला उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटाकडून दाखल करणार आहेत.कळमनुरी मध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी फोन पे ने पाठवा असे वक्तव्य केले होते.या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे.आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.निवडणूक विभागाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना त्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.पुढील २४ तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा; असे त्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!