- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-भेंडळा येथील सृजल आज सुट्टीचा दिवस असल्याने दुचाकी क्रमांक-एम.एच ३४ बी एस ९४४६ वाहनाने गावातून शेताकडे जाण्यासाठी निघाला होता. अशातच चिमूर कडून शेगावाकडे येत असलेल्या एम.एच ४० बी एल ३९८८ क्रमांकाच्या बसची सृजलच्या दुचाकीला जबर धडक बसली.धडक एवढी जोरदार होती की,त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक बसताच एसटी बसच्या काचेला तो आदळला. त्यानंतर दुचाकी बसच्या समोरील चाकात येऊन शंभर मीटर पर्यंत फरफटत गेली.सदरची घटना आज, रविवारी २० ऑक्टोंबरच्या सकाळी सातच्या सुमारास वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर वरोरा तालुक्यातील शेगाव बु.जवळील भेंडळा फाट्यावर घडली.सृजल राजू साळवे वय १५ वर्षे असे मृताचे नाव आहे.
प्रत्यक्ष दर्शिंनी सर्व दृश्य बघता नागरिकांनी संताप व्यक्त करीत तब्बल चार तास रास्तारोको केला. टायरांची जाळपोळ करून रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने मृतच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाल्याने दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
- Advertisement -

