Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीवाघाचा गुराख्यावर मागून हल्ला; जीव वाचला पण.. -गडचिरोली तालुक्यातील घटना..

वाघाचा गुराख्यावर मागून हल्ला; जीव वाचला पण.. -गडचिरोली तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गुरे चराईसाठी जंगल परिसरात गेलेल्या गुराख्यावर वाघाने मागून हल्ला चढविल्याची घटना गडचिरोली तालुक्याच्या बोदली जंगल परिसरात शनिवारी १९ ऑक्टोंबर च्या दुपारी घडली.गुराख्याने प्रसंगावधान साधल्याने जीव वाचला पण हल्ल्यात  पाठीवर व मांडीवर वाघाच्या पंज्याचे ओरखडे पडले.यादव जराते वय ६० वर्षे,रा.बोदली असे वाघाच्या हल्ल्यात जखमी गुराख्याचे नाव आहे.नेहमीप्रमाणे जराते हे शनिवारी एका सहकाऱ्यासोबत  बोदली गावापासून दोन किमी अंतरावरील जंगलातील कंपार्टमेंट नंबर- १७९ मध्ये गुरे चराईसाठी गेले होते. स्वतः एका टोकाला तर दुसरा साथीदार दुसऱ्या टोकाला राहून ते गुरे चारत असतांनाच दुपारी १:३० च्या सुमारास वाघाने यादव जराते यांच्यावर मागील बाजूने हल्ला केला.या हल्ल्यात यादव यांच्या पाठीवर व मांडीवर वाघाच्या पंज्याचे ओरखडे पडले.सुदैवाने वाघाला यादव यांची मान सापडली नाही.त्यामुळे ते थोडक्यात बचावले; पण वाघ गुरगुरतच असल्याचे जराते यांनी कळविले. त्याने यादव यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या हातात लांब दांड्याची कुऱ्हाड व एक काठी होती.हेच साहित्य त्यांच्या रक्षणासाठी कामी आले.यादव यांनी जोरजोरात आवाज करून कुऱ्हाडीने वाघाचा हल्ला परतावून लावला.तोपर्यंत दुसरा सहकारी गुराखी तेथे पोहोचल्याने वाघाने तेथून काढता पाय घेतला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!