- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-रोजगार हमी योजनेअंतर्गत
जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मजूरांद्वारे कामे केली जात आहेत.अशातच आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी शिवारात रोजगार हमीचे काम करतांना भोवळ येऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवारी २१ जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जीवन रामा नेवारे वय ५८ वर्षे,रा. देलनवाडी,ता.आरमोरी असे मृताचे नाव आहे.
गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळावा; यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून गाव शिवारात विविध कामे केली जातात.त्यानुसार रोजगार हमीच्या अकुशल कामांतर्गत देलनवाडीच्या शेतशिवारात मजगीचे मातीकाम सुरू आहे.यावर जीवन नेवारे हे १७ जानेवारीपासून काम करीत होते.काल मंगळवारी काम करीत असतांनाच त्यांना अचानक भोवळ आली आणि जमिनीवर कोसळले.त्यातच जवळच काम करणाऱ्या मजुरांनी जीवन यांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.मात्र,तपासणी अंती आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सुपारे यांनी मृत घोषित केले.
- Advertisement -

