Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरातील मोटारसायकल चोर गजाआड.. - १ लाख २५ हजार किंमतीच्या दोन...

देसाईगंज शहरातील मोटारसायकल चोर गजाआड.. – १ लाख २५ हजार किंमतीच्या दोन मोटारसायकल जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.अशातच शनिवार १८ जानेवारी २०२५ ला दोन मोटार सायकली चोरीला गेल्याची तक्रार देसाईगंज पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप यांनी सदर प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर यांचेकडे सोपविली.त्यानुसार आगरकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवीत मोटारसायकल चोरास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तुषार उर्फ तरुण गुज्जेवार वय २२ वर्षे रा.हनुमान वार्ड देसाईगंज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवार १८ जानेवारीला देसाईगंज शहरातील दोन तक्रारदारांनी एम एच ३५ ए एल ६१७० क्रमांकाची काळ्या रंगाची होंडा स्पेलंडर प्लस अंदाजे किंमत ८० हजार रुपये व एम एच ३३ यू ३९३० क्रमांकाची होंडा शाईन मोटारसायकल अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीची दोन वाहने चोरीस गेल्याची तक्रार देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी तपासात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली. पेट्रोलिंग वाहनासह पोलीस शिपाई कडव,पोलीस शिपाई गरमडे व लॅपटॉपच्या सहाय्याने लोकेशनचे आकलन करीत संदिप आगरकर हे देसाईगंजच्या हनुमान वार्डातिल तुषार राजु गुज्जेवार यांच्या घरी पोहचले असता त्याचे घरी दोन मोटार सायकली आढळुन आल्या.त्याला सदर वाहनांच्या कागदपत्रांची विचारणा करताच सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र,पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या  दोन्ही मोटारसायकली चोरल्या असुन त्या विक्री करण्यासाठी तयारी करत असल्याचे मान्य केले.त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी सदर मोटार सायकली जप्त करुन आरोपीला गजाआड करण्यात आले.मोटारसायकल चोरी प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी तुषार गुज्जेवार हा पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथील खुनाच्या गुन्ह्यातीलही आरोपी असुन  देसाईगंज पोलिसांनी त्याची वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपासात आरोपीकडुन इतरही गुन्हे केल्याची माहिती प्राप्त होऊ शकते,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!