चंद्रपूर :-आता यांना काय म्हणावे? सातव्या वेतन आयोगानुसार शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना छप्पर फाड पगार असूनही वरच्या कमाई शिवाय अनेकांचे पोटच भरत नाही वाटते.शंभरातून एखादाच व्यक्ती याला अपवाद म्हणावे लागेल,नाहीतर हातमिळवणी करून इतर कमाई करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवतीचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार प्रवीण चिडे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून मिळालेले अनुदान शासकीय नियमानुसार खर्च न करता बोगस देयके जोडत रकमेची अफरातफर करणे,रेती तस्करांना सहकार्य करणे व इतर प्रकरणी ठपका ठेवत राजुराच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चिडे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याने जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.त्यातच शासनाकडून मिळालेले अनुदान आणि पुरवठादारांना दिलेल्या धनादेशात तफावत आढळून आली आहे.त्यामुळे प्रभारी तहसीलदार प्रवीण चिडे यांच्यावरती निलंबनाची टांगती तलवार ओढवलेली आहे.
रेती तस्करांना सहकार्य केल्याचा ठपका; तहसीलदारास निलंबित करण्याचा प्रस्ताव..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

