Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियागावगाडा हाकणाऱ्या सदस्यांना जोरदार झटका; एका विद्यमान सरपंचासह तब्बल ५६ सदस्य अपात्र...

गावगाडा हाकणाऱ्या सदस्यांना जोरदार झटका; एका विद्यमान सरपंचासह तब्बल ५६ सदस्य अपात्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गावचा गावगाडा हाकणाऱ्या राखीव जागांवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका विद्यमान सरपंचासह तब्बल ५६ सदस्य अपात्र ठरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी नुकताच जारी केला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काही निवडक ग्रामपंचायतमध्ये जानेवारी २०२१,ऑक्टोंबर २०२२,तसेच डिसेंबर २०२२ मध्ये सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या.अनु,जाती जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व विनियमन अधिनियम २००० (२००१ च्या महा.२३) च्या तरतुदींना अनुसरून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्याने मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात आला होता.
विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ७ ऑक्टोंबर २०२४ व २७ जानेवारी २०२५ अशा प्रकारे दोनदा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली होती.मात्र,दोनदा दिलेल्या संधीचे सोने करण्यात तब्बल ५६ सदस्य अपयशी ठरल्याने व विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने सर्वांवर अपात्रतेची टांगती तलवार ओढवून अपात्र ठरविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!