Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवास प्रारंभ...

गडचिरोलीत “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवास प्रारंभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर,संस्कृति मंत्रालय,भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक- १ ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता “लोक नृत्य भारत भारती” या महोत्सवाचे आयोजन विद्याभारती कन्या हायस्कूल,गडचिरोली येथे करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन काल शनिवारी विद्याभारती कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीचे संस्थापक राजाभाऊ मुनघाटे,गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन मुंबई, नागपूर विभागाचे सहायक संचालक संदीप शेंडे उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी/कोळी नृत्य,मध्य प्रदेशातील बधाई/नोरता, राजस्थानचे रंगीले नृत्य कालबेलिया/भवाई/चरी, हरियाणाचे घूमर/फाग नृत्य, गुजरातचे जोशपूर्ण सिद्धी धमाल नृत्य,ओडिशाचे संबलपुरी/दालखाई नृत्य आणि छत्तीसगडचे कर्मा नृत्य अशा विविध लोकनृत्यांचे रंगारंग सादरीकरण करण्यात आले.
प्रथम दिवशी महोत्सवात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.कलाकारांच्या अप्रतिम नृत्यप्रस्तुतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रम संस्कृति मंत्रालय,भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारला जात असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव  विकास खारगे (भा.प्र.से.)यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील विविध संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक लोककला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात आहे.
या महोत्सवाच्या आयोजनासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा,असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!