Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीशाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. - गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.नुकतेच जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील ओरेवाडा ग्रामपंचायतीअंतर्गत आदिवासी विकास कार्यक्रमाच्या ५३ विकासकामांच्या ई-निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत भामरागड पंचायत समितीचे शाखा अभियंता गोविंद शिरपूरकर यांना निलंबित करण्यात आलेले असतांनाच आता एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी)मनोज गेडाम यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे.ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभार,आर्थिक व्यवहार आणि ग्रामस्थांच्या तक्रारींच्या चौकशीनंतर सदरची कारवाई करण्यात आली.मनोज गेडाम यांच्या बाबतीत ग्रामसभा व मासिक सभा नियमित न घेणे, सभांचे कार्यवृत्त न लिहिणे,१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेत ई-निविदा, पाच टक्के अबंध निधीचा नियमबाह्य वापर करणे तसेच मुख्यालयात अनुपस्थित राहणे,अशा बाबी चौकशीत निदर्शनास आल्या.त्यानुसार सखोल चौकशी अंती मनोज गेडाम यांना निलंबित करण्यात आले व निलंबन काळात
त्यांना भामरागड पंचायत समिती मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!