Sunday, September 6, 2026
Homeभंडारारस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू..!

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला दुचाकीची बसच्या समोरील भागास जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण दूरवर फेकला जाऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना आज, सोमवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भंडारा पोलिस ठाणे हद्दीतील पालांदूर-मानेगाव राज्यमार्गावरील गोंडेगाव येथील वळणावर घडली. आशिष रमेश गोंडाणे वय ३७ वर्षे, रा.पालांदूर, ता.लाखनी,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
एमएच ०६ एस८८३४ क्रमांकाची बस विहीरगाव वरून पालांदुरमार्गे लाखनीकडे जात होती.अश्यातच गोंडेगाव जवळून जात असतांना समोर म्हशींचा कळप आल्याने बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी आशिष गोंडाणे हा एमएच ३६ एएन ५४२८ क्रमांकाच्या दुचाकीने लाखनी वरून स्वगावी पालांदूरकडे परत जात असतांनाच वळणावर उभ्या असलेल्या एसटी बसला दुचाकी जाऊन धडकली.धडकेनंतर आशिष दूरवर फेकला जाऊन रस्त्यावर पडला.त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला.लागलीच नागरिकांनी त्याला लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले.तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.पालांदूर पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखनी येथे पाठवला.घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!