- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी नुकतेच राज्य शासनाने १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती.त्यासंदर्भात तसा शासन निर्णयही काढला होता.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे.यापूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे २ हजार रुपये ३१ मार्च २०२५ रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे(डीबीटी)जमा करण्यात आले होते.अश्यातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज,मंगळवार ९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे.
- Advertisement -

