- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघाचे हल्ले संपता संपेना.मुख्यत्वे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे.नुकतेच शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी सावली तालुक्याच्या पाथरी गावातील एका ६५ वर्षीय शेतकऱ्यास वाघिणीने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच परत चार दिवसांनंतर आज,सोमवार ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुल तालुक्यात एका ६० वर्षीय महिलेस वाघाने ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना मुल तालुक्याच्या सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथे घडली असून अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने वय ६० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
अन्नपूर्णा बिलाने ही महिला नेहमी प्रमाणे आजही
पहाटेच्या सुमारास जागी झाली आणि रात्रीचे भांडे घासण्यासाठी घराच्या मागील बाजूस निघाली.मागील भाग जंगल व्याप्त असल्याने परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने घराच्या मागे असलेल्या अन्नपूर्णा बिलाने हिच्यावर अचानकपणे हल्ला चढवत तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.त्यामुळे तिने आरडाओरड करताच पती तुळशीराम झोपेतून जागा झाला आणि मदतीसाठी धावून गेला.पतीने पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न केला.प्रसंगी फॉर्म मधील नागरिक धावून गेल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला.मात्र,वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अन्नपूर्णाचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती सोमनाथ प्रकल्पाचे समन्वयक अरूण कदम यांनी वनविभागास दिली.वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
- Advertisement -

