Monday, August 31, 2026
Homeगडचिरोली‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली,कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते झाले.या महोत्सवात गडचिरोलीसह भंडारा,गोंदिया,चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या स्थानिक आंबा वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले.कोयतूर,बीईओ,विशाखा स्थानिक,रसराज यासह विविध स्थानिक वाण प्रदर्शनात मांडण्यात आले.प्रदर्शनातून उत्कृष्ट वाणांची निवड करून त्यांचे संशोधन,संवर्धन व पुढील प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथील आंबा महोत्सवात आरमोरी येथील शेतकरी प्रमोद कांबळे यांनी तब्बल १ किलो ४०० ग्रॅम व १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे  ‘कलेक्टर’ जातीचे आंबे प्रदर्शित करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले की,गडचिरोली जिल्ह्यात आंबा लागवडीस मोठी संधी आहे.फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे कृषी विभाग,कृषी विज्ञान केंद्र व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंबा लागवडीला चालना द्यावी.कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,आत्मा प्रकल्प संचालक,कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी,संशोधक, विषय विशेषज्ञ तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!