Friday, October 16, 2026
Homeनागपूरअजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी उष्ण हवेचा मारा सुरु केल्याने थंड हवेसाठी कुलरशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच एका विद्यार्थिनीने वसतिगृहासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केल्याने वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे.आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे.ती नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते.सध्या वाढत्या तापमानामुळे विदर्भात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे आकांक्षा व तिच्या मैत्रिणींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसतिगृहासाठी कुलरची मागणी केली.तिच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने तात्काळ कुलर उपलब्ध करून दिले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढल्याची माहिती आहे.याचाच राग मनात धरून आता वसतिगृह प्रशासाने आकांक्षा उके हिलाच वसतिगृहातून हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे.यामुळे या गरीब विद्यार्थिनीच्या पायाखालची वाळू सरकली आहे.वसतिगृहाने आकांक्षा उके ही बाहेर नोकरी करते असा आरोप करत तिची हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे.तसेच तिच्याकडून ६ महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्चही जमा करण्याची ताकीद दिली आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे.तसेच गरीब विद्यार्थिनीसोबत होणारा हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याचा आरोपही केला आहे.विजय वडेट्टीवार म्हणाले,नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीने उन्हाच्या तीव्रतेत कूलरची मूलभूत सुविधा मागितली आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केली, त्यानंतरच तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली,हा प्रकार अतिशय निंदनीय व
लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा असल्याचे म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!