Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरपाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. - वाघाच्या अफवेने वनविभागासह...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून गावकऱ्यांनी वाघाने मारल्याची बोंब सुरू होताच अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील कोलारी परिसरात उघडकीस आली.माधव कानूजी रेवाडे वय ५२ वर्षे,रा.काकेपार, ता.पवनी,जि.भंडारा असे मृतकाचे नाव असून ते शेळ्या राखण्याचे काम करायचे.त्यातच,शनिवार २३ मे २०२६ रोजी त्यांनी घरच्यांना दवाखान्यात जाऊन येतो,असे म्हणून बेपत्ता झाले होते.कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.अश्यातच शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस व वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!