- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगाने धावत असलेल्या ट्रकची जोरदार धडक बसून कार फरफटत गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सलूनमध्ये घुसली.यात सलूनमध्ये असलेला ३४ वर्षीय दुकान चालक कारच्या धडकेत चिरडला गेला आणि घटनास्थळीच मृत पावल्याची घटना घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाटा येथे काल बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.शंकर जुनारकर वय ३४ वर्षे,रा.घुग्घुस, जि.चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या सलून दुकान चालकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,एमपी ११ झेड ०९३४ क्रमांकाचा सिमेंट वाहतूक करणारा कॅप्सूल ट्रक
गडचांदूरकडून पडोलीच्या दिशेने भरधाव धावत सुटला.धावत असतांनाच धानोरा फाटा परिसरात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच ३४ एए ००५१ क्रमांकाच्या कारला जाऊन धडकला.धडक इतकी भीषण होती की उभ्या कारला फरफटत नेत थेट बाजूला असलेल्या सलूनमध्ये घुसवले.या भीषण धडकेत सलून चालक शंकर जुनारकर जागीच गतप्राण झाला.अपघात घडताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.याबाबत पोलिसांना माहिती दिली.घटनेत कार चालक किरकोळ जखमी झाला.मात्र,एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

