Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरफिट आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले; पाच वाहनांना धडक - सहा प्रवाशी गंभीर...

फिट आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले; पाच वाहनांना धडक – सहा प्रवाशी गंभीर तर सात प्रवासी किरकोळ जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ब्रह्मपुरी येथून एसटी बस प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे जात असताना बस चालकाला फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पाच वाहनांना धडक देत एका गॅरेजमध्ये शिरली. या घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असून सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली.जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी आगाराची बस ३५ प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे निघाली होती.बसचालक सचिन कुळमेथे यांना सिंदेवाही शहरातील पेट्रोल पंपाजवळ फिट आली,असे प्रवाशांनी सांगितले आहे.फिट आल्याने कुळमेथे यांचे बसवरील नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटलेल्या बसने मार्गातील दोन दुचाकी,एक ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहनांना धडक दिली.या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.वाहनांना धडक दिल्यानंतर बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली.या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.मात्र धडक दिलेल्या वाहनांचे आणि गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सहा प्रवाशी गंभीर तर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या चौघांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या जखमीवर सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!