उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):- दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर देसाईगंज-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मार्ग बंद पडत होता. पावसाच्या दिवसात वैनगंगा नदीला पूर येत असल्याने या पुलावरून पाणी वाहते.त्यामुळे वाहतूक ठप्प केली जायची.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ देसाईगंज-ब्रम्हपुरी ते थेट कुरखेडापर्यंत जातो.अशातच आता नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे.नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग रहादरीसाठी बंद करण्यात आला आहे.

