Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीआधी कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे लावले व्यसन…!-अन् आता रिचार्ज दरवाढ...

आधी कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे लावले व्यसन…!-अन् आता रिचार्ज दरवाढ करून सर्वांना घातले येसन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मोबाइल ही आजच्या घडीला गरजेची वस्तू झाली आहे.एक वेळ जेवण नसले तर जमेल परंतु, मोबाइल आवश्यक आहे.नेमके हेच हेरून सर्वच कंपन्यांनी रिचार्जचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे.रिचार्ज करून देखील नेटवर्कची समस्या उद्भवत आहे.यामुळे,मोबाइलधारकांची लूट होत आहे.सुरुवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्या नंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये वाढ करून एकप्रकारे ‘व्यसन आणि येसन’ असा प्रकार सुरू झाला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.विशेषतः कोविडमुळे झालेल्या टाळेबंदी पासून मोबाइल आणि ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली आहे.वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थीसुद्धा स्मार्टफोनचा आणि इंटरनेटचा वापर करतात. कार्यालयीन कामासाठी चाकरमान्यांना,शिक्षकांना माहिती टाकण्यासाठी,शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणीसाठी स्मार्टफोन आणि डाटाची गरज भासते. वीजबील दरवाढी पाठोपाठ रिचार्जचे दरही आपसुकच वाढले आहेत.

अलिकडे शेती,शिक्षण,कार्यालयीन कामकाज अशा सर्वच कामांसाठी स्मार्ट मोबाइलचा वापर केला जातो. त्यासाठी इंटरनेट आणि डाटाची गरज भासते.दरम्यान कंपन्यांनी कॉल आणि डाटाचे दर वाढविल्याचा फटका नोकरदारच नव्हे; तर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वच नेटकरी ग्राहकांना बसला आहे.कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे रिचार्ज महाग केले आहेत.हे बदल गुरुवार,दिनांक-४ जुलै पासून लागू झाले आहेत.तिन्ही कंपन्यांनी जिओ,एअरटेल आणि व्होडाफोन यांनी प्लॅन्समध्ये २७ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.देशात कोट्यवधी लोक मोबाइल फोन वापरतात.त्यामध्ये अगदी तळागाळीतील जनतेचाही समावेश आहे.त्यामुळे रिचार्ज प्लॅन दरवाढीचा परिणाम थेट त्यांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.टेलीकॉम कंपन्यांनी मासिक,त्रैमासिक व वार्षिक रिचार्ज प्लानचे दर वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक चणचणीत टाकले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!