उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे.ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे; मात्र काही समाजकंटकांनी महाराष्ट्र शासनाच्या या योजनेच्या नावाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.’प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रसार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी,याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.त्या अनुषंगाने पोंभूर्णा पोलिसांनी धम्मा निमगडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोंभूर्णा येथील धम्मा निमगडे यांनी योजनेची थट्टा करून ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ नावाची फसवी योजना व्हॉट्स ॲपद्वारे प्रसारित केली.या प्रकरणी पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
धम्मा निमगडे,प्रसिद्धीप्रमुख,काँग्रेस कमिटी पोंभूर्णा👇
मला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्व घटकातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगायचे होते.ती पोस्ट डिलीट झाली आणि चुकीने ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ अशी पोस्ट प्रसारित झाली.यात माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
–

