Monday, June 22, 2026
Homeभंडाराभंडारा जिल्ह्यात धान घोटाळ्यांची मालिका संपता संपेना..!-गडचिरोली जिल्ह्यातही मोठे घबाड उघड होण्याची...

भंडारा जिल्ह्यात धान घोटाळ्यांची मालिका संपता संपेना..!-गडचिरोली जिल्ह्यातही मोठे घबाड उघड होण्याची शक्यता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या चार जिल्ह्यात धानाची लागवड करण्यात येते.परंतु,कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,कधी किडीचा प्रादुर्भावामुळे  धान शेती बेभरवशाची झाली आहे.परिणामी, शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हमीभाव आणि बोनस दिला जातो.आणि यातूनच गैरव्यवहार होऊन शेतकरी पिचला जातो.

धान्याचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळ्याचे सत्र संपण्याऐवजी वाढतच आहे.सन २०२१ ते २३ या दोन वर्षांत ४०.३९ कोटी रूपयांचा धान घोटाळा उघडकीस आला.याप्रकरणी ११ संस्थांच्या पदाधिकाऱ्याविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून आणखी एका संस्थेविरूद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.केवळ एकट्या भंडारा जिल्ह्यातच धान घोटाळा होत आहे; असे म्हणणे चुकीचे आहे. सगळीकडेच घोटाळेबाज उदयास आले आहेत. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातीलही धान घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात धान घोटाळ्यांची मालिका २०११-१२ च्या सुमारास सुरू झाली.मागील दोन वर्षांत संत रविदास मागासवर्गीय सेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था तुमसर,आधार सेवा सहकारी संस्था पवनी,अन्नपूर्णा सेवा सहकारी संस्था बपेरा,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आंबागड,विविध सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी, विविध सेवा सहकारी संस्था वाहणी,माँ शारदा सेवा सहकारी संस्था मुंढरी बुज.,एकता सहकारी संस्था बेला,आकांक्षा सेवा सहकारी संस्था तुमसर,पुष्पाअमृत सेवा सहकारी संस्था बेलाटी, राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था गवराळा आदींचा समावेश आहे.या दोषी संस्था चालकांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

२०२१-२२ आणि २०२२-२३ या खरीप व रब्बी हंगामात वरील संस्थांनी ४ लाख ४७ हजार ४३६ क्विंटल धानाची खरेदी केली होती.यापैकी ३ लाख १० हजार ६४७ क्विंटल धानाची राइस मिलमालकांनी उचल केली.त्यामुळे १ लाख ३६ हजार धानाची संस्थाचालकांनी परस्पर विल्हेवाट लावली. चौकशीअंती ही तूट दिसून येताच जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित संस्थाचालकांनी ४० कोटींची परतफेड न केल्यास संस्थाचालकांनी पणन विभागाकडे जमा केलेले १० लाख रूपये रोख आणि ५० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!