Tuesday, August 11, 2026
Homeगडचिरोलीराज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. - गडचिरोलीत वृक्ष...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीयोग्य क्षेत्र निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या विशेष बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत जिल्ह्यातील वृक्षारोपणासाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या जमिनींचा आढावा घेण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली.मात्र,या जमिनींपैकी प्रत्यक्ष वृक्ष लागवडीसाठी किती क्षेत्र उपयुक्त आहे,याची खात्री करण्यासाठी महसूल,वन व संबंधित विभागांनी संयुक्तरीत्या प्रत्यक्ष स्थळभेटी घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.या पडताळणीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
बैठकीत महसूल जमीन,अवनत वन क्षेत्र तसेच इतर शासकीय जागांवर विविध वृक्षारोपण मॉडेल्स राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.लागवडीयोग्य क्षेत्राचा अंतिम आकडा निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यासाठी आवश्यक निधी व मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार असून,जिल्हा नियोजन समिती जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि रोजगार हमी योजना यांसारख्या विविध स्त्रोतांमधून निधी उपलब्ध करून वृक्षारोपण मोहिमेला गती दिली जाणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील मागील वर्षाच्या एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टावरही चर्चा करण्यात आली. यापैकी मागील पावसाळ्यात ४० लाख वृक्ष लागवड करण्यात आले असून या हंगामात ३० लाख वृक्ष लागवड करण्याबाबतच्या सूक्ष्म नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘हरित महाराष्ट्र आयोगा’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील वृक्षारोपण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.हरित पायाभूत सुविधा विकास, पर्यावरणीय समतोल आणि हरित क्षेत्रवाढ या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,उपवनसंरक्षक श्रीमती आर्या,सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम.,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी तथा संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव गणेश झोडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर,उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,जिल्हा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे उपस्थित होते. तसेच मुख्यालयाबाहेरील सर्व उपवनसंरक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!