Wednesday, August 26, 2026
Homeचंद्रपूर'प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना' असे नाव देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल..

‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ असे नाव देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे.ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे; मात्र काही समाजकंटकांनी महाराष्ट्र शासनाच्या या योजनेच्या नावाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.’प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रसार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी,याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.त्या अनुषंगाने पोंभूर्णा पोलिसांनी धम्मा निमगडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोंभूर्णा येथील धम्मा निमगडे यांनी योजनेची थट्टा करून ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ नावाची फसवी योजना व्हॉट्स ॲपद्वारे प्रसारित केली.या प्रकरणी पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

धम्मा निमगडे,प्रसिद्धीप्रमुख,काँग्रेस कमिटी पोंभूर्णा👇

मला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्व घटकातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगायचे होते.ती पोस्ट डिलीट झाली आणि चुकीने ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ अशी पोस्ट प्रसारित झाली.यात माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!