Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरपुराच्या पाण्यात कार गेली वाहून; सुदैवाने दोघांचा जीव वाचला…

पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; सुदैवाने दोघांचा जीव वाचला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातून आज,२८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मोठी घटना समोर आली आहे.सध्याच्या स्थितीत विदर्भात पावसाने मोठी धूम ठोकली आहे.पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही.अशातच चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.मोठे व मध्यम प्रकल्पासह तलाव तुडूंब भरले आहेत.जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत.छोट्या-मोठ्या नाल्यांना पुर आला आहे. त्यातच चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी मार्गावरील स्मशानभूमीसमोर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना आज,रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन युवकांनी पुराच्या पाण्यात कार नेली.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पुलावर कार जाताच पाण्याच्या प्रवाहात कार पुलावरून घसरू लागल्याने कार चालक आणि सहकारी यांनी प्रसंगावधान साधत कारच्या बाहेर निघाले.कारच्या बाहेर निघताच पुलावरून कार नाल्यात पडली.

सुदैवाने वाहनातून दोघेही बाहेर आल्याने जीव वाचला.मात्र कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. सायंकाळ पर्यंत त्या कारचा शोध लागलेला नव्हता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!