Monday, October 26, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १८२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली…-१ कोटी ९ लाख रुपये...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १८२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली…-१ कोटी ९ लाख रुपये नुकसान भरपाई वसूल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले असून एकुण १ कोटी ०९ लाख ३५ हजार ७२९ रुपये नुकसान भरपाई वसुली करण्यात आली आहे.तसेच किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूलीद्वारे निकाली काढण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक-२७ जुलै,२०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे,बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपूर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे,पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे,फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे,ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे,घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हयात एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. 

व्ही.एस.कुलकर्णी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,गडचिरोली व आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.एस.पी.सदाफळे दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांनी पॅनल क्र.१ वर काम पाहीले,पॅनल क्र.२ वर सी.पी.रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.)गडचिरोली,पॅनल क्र.३ वर  श्रीमती व्ही.आर.मालोदे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहिले.

दिनांक- २७ जुलै २०२४ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं.कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती एन.ए.पठाण तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालय कार्यरत होते.तसेच पॅनल क्रमांक-१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून गौतम दयाराम डांगे सामाजिक कार्यकर्ता,पॅनल क्रमांक-२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून मनोहर माधवराव हेपट सामाजिक कार्यकर्ता,पॅनल क्रमांक-३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु.अर्चना लहुजी चुधरी सामाजिक कार्यकर्ता यांनी काम केले.सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!