Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीपहिल्यांदा नागरिकांना वाघाचे दर्शन; महिला परतली नाही म्हणून कुटुंबीयांना संशय..

पहिल्यांदा नागरिकांना वाघाचे दर्शन; महिला परतली नाही म्हणून कुटुंबीयांना संशय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-पूर्वीसारखा वाघाचा धुमाकूळ कमी असला तरीही भय इथले संपत नाही.असाच प्रकार काल,गुरुवारी ५ जून रोजी आरमोरी तालुक्याच्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील देलोडा जंगल परिसरात उघडकीस आला आहे.एका ५५ वर्षीय निरपराध महिलेला वाघाने ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मीरा आत्माराम कोवे रा.सुवर्णनगर,देलोडा ता.आरमोरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करणाऱ्या मीरा कोवे या गुरुवारी सकाळच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या.अश्यातच त्याच जंगल परिसरातील मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम वाघाचे दर्शन झाले होते.त्यामुळे सदरची माहिती नागरिकांनी गाव परिसरात दिली होती.त्यातच टोळी वेचण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या मिरा कोवे या सकाळपासून दुपार व्हायला आली तरी घरी परतल्या नव्हत्या.त्यामुळे नागरिकांना वाघाचे दर्शन झालेली बातमी कुटुंबीयांच्या कानावर पडली होती.यात शंका बळावल्याने वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी जंगल परिसरात दुपारी चार वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरू केली असता,मीरा कोवे यांना वाघाने ठार केलेला मृतदेह आढळला.वन विभागाने पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.घटनेने परिसरात भीती पसरली असून परत पुन्हा अनुचित घटना घडू नये, याकरीता वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!