Thursday, October 22, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न..

देसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राज्याच्या संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वारे आभासी पद्धतीने(ऑनलाईन)उद्घाटन करून, औद्योगिक प्रशिक्षण संस्था विभागाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून देसाईगंज येथील इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल,शुक्रवार ६ जून रोजी शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करून संपन्न करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नारायणराव वैद्य आय.एम.सी.सदस्य व डॉ.प्रा.हितेंद्र धोटे यांनी नागरी कर्तव्य,कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार,सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या पाच पंच परिवर्तन मौलिक बाबींचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.या प्रत्येक घटकाचा उद्देश म्हणजे समाजात जबाबदारीची जाणीव निर्माण करणे,भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे आणि लोकसहभागातून व्यापक परिवर्तन घडवून आणणे हे होय,असे मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास मसराम,आफताब आलम खान आय.एम.सी.अध्यक्ष, लालसिंह खालसा आय.एम.सी.सदस्य,  गोपाल उईके यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाला मुर्लीधर सुंदरकर,योगेश निकम आय.एम.सी.सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी  यांनी भूषविले होते.तर रविकांत गोतमारे गटनिर्देशक, श्रीमती माया जाधव प्रभारी गतनिर्देशक यांच्या मार्गदर्शनात सदर संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.वाय.नागमोती प्रभारी गटनिर्देशक,
सूत्रसंचालन सी.एम.गरमळे रा.से.यो.समन्वयक व  आभार प्रदर्शन जे.टी.काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.जी.अंबादे,सी.डी.समर्थ, एम.बी.मेश्राम,आर.बी.भोयर,टी.यु.सोयाम,बी.बी.घरडे, कु.एम.सी.चौदंते,बी.एन. नैताम,आर.सी.निखाडे,राहुल कऱ्हाडे,श्रीमती.एन.डी.भडके,जी.जे.ठाकरे,एम.वाय कापगते,एस.एम.मेश्राम,एस.एन.पठाण, कु.ए.आर.सोंदरकर,श्रीमती एन.डी. भडके, पी.बी.धाकडे,शंकर निकुरे,संस्थेतील कार्यरत सुरक्षा रक्षक व रा.से.यो.स्वयंसेवक तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!