Wednesday, June 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतकऱ्यांचा बोनस जमा होण्याचा मार्ग मोकळा..

आता शेतकऱ्यांचा बोनस जमा होण्याचा मार्ग मोकळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील महायुती सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती; पण या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही.परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.तर बोनसची रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगामसुद्धा अडचणीत आला होता.ही बाब माजी आ.राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर खासदार पटेल यांनी या विषयावर काल शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बोनससाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तसेच या विषयावर सविस्तर चर्चा केली.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी बोनससाठी लागणारा ९०० कोटी रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम दहा दिवसांच्या आत उपलब्ध करून दिली जाईल,असे सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!