Saturday, July 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज मोठा विजय झाला आहे.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज,शनिवार २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.तसेच प्रधान यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर दोन पानी पत्रक प्रसिद्ध करून “मी देशातील तरुणांच्या आकांक्षा,भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो.भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे.पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो”.असे म्हटले आहे.
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यापासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात येत होती.या मुद्द्यावरून कॉक्रोच  जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाला सुरुवात केली होती.तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल २६ दिवस उपोषण केले होते.दरम्यान,प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी संसदेवर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण आले.पोलिसांनी मोर्चावर केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर,या आंदोलनाला विविध क्षेत्रांमधून,तसेच देशभरातून पाठींबा मिळाला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनाम्याची घोषणा केली.
  • धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेले पत्र👇
माझ्या तरुण मित्रांनो,
मी चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे.माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा,भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो.भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे.पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
मात्र,३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली.भारत सरकारने याची तात्काळ दखल घेतली,तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली आणि परीक्षेचे पुनर्नियोजन केले. तसेच,पुढील वर्षापासून परीक्षा सीबीटी(संगणक-आधारित चाचणी)पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या काळात,२० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे हे आमचे प्रमुख प्राधान्य होते. हे साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन अवलंबण्यात आला.भारत सरकारने,राज्य सरकारसह, विशेषतः जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शिवाय,विद्यार्थी,पालक आणि पालकांच्या सहकार्याने,२१ जून २०२६ रोजी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.
पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही दूर फिरलो नाही. परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येऊ न देणे,तसेच कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देणे,हा माझा दृढनिश्चय होता.१६ जुलै रोजी जाहीर झालेला नीट यूजीचा निकाल समाधानकारक असून,गरीब पार्श्वभूमीच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे.पण या काळातही, जबाबदार पदांवर असलेल्या लोकांनी अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे मला अत्यंत दुःख झाले.
मला आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्यावर नेहमीच अढळ विश्वास राहिला आहे आणि मी आपल्या तरुणांच्या आकांक्षा,स्वप्ने आणि ध्येयांविषयी मनापासून आदर बाळगतो.ते केवळ भारताचे भविष्य नाहीत,तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक,निर्माते आणि शिल्पकारही आहेत.
गेल्या १० दिवसांतील घटनांमुळे मला दुःख झाले आहे.हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही.
भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे.
मी देशातील तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही,हा माझा दृढनिश्चय आहे.
जंतर मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकवून ठेवली पाहिजे,भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकता कामा नये,आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासात घालवावा,करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे,हे लक्षात घेऊन मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांना पाठवला आहे.
मी माननीय पंतप्रधानांचे त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल, विश्वासाबद्दल आणि सततच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.तसेच,मंत्रिमंडळातील माझे सर्व आदरणीय सहकारी,मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, त्या सर्वांचेही मी आभार मानतो. राष्ट्रसेवा करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे.मी त्यासाठी सदैव समर्पित राहीन.
भगवान श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादाने,मी भारतमातेच्या,ओडिशाच्या जनतेच्या आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही सर्वतोपरी स्वतःला समर्पित करत राहीन.
धर्मेंद्र प्रधान
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!