Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजआता अवैध मुरूम तस्करीचा धुमाळा..! - देसाईगंज शहरासह ग्रामीण भागातील मुरूम चोरटे...

आता अवैध मुरूम तस्करीचा धुमाळा..! – देसाईगंज शहरासह ग्रामीण भागातील मुरूम चोरटे सक्रिय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अगोदरच देसाईगंज तालुक्यात अवैध रेती चोरीने धुमाकूळ घातलेला असतांनाच आता त्यात आणखी एका गौण खनिजाची भर पडून अवैध मुरूम तस्करीचा धुमाळा देसाईगंज शहरासह ग्रामीण भागातील मुरूम चोरट्यांनी चालवला आहे.शहरातील दोन टीम तर ग्रामीण भागातील तीन ते चार टीम सक्रिय असून अश्यांचा शासनाची गौण खनिज चोरी करण्याचा गोरखधंदा झाला आहे.त्यामुळे शासनाच्या महसुलास लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे.असे असतांनाही महसूल विभाग झोपेचे सोंग घेतांना दिसून येत आहे.त्यातच अगदी पोलिस स्टेशनच्या समोरून बेधडकपणे अवैध गौण खनिजाची वाहतूक सुरू असतांनाही यावर कुणाचेही लगाम नसल्याचे दिसून येत आहे.
मुरूम चोरीत वाहतूक पास एक तर अवैध मुरूम वाहतूक अनेक.यात अधिकारी,कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून रोजिची माणसे नेमून सूत्रे हलविण्यात येतात. त्यातच महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचेही अभय असते.महसूल विभागाची कारवाई पाहिजे त्या  प्रमाणात होत नसल्याने दिवसेंदिवस मुरूम चोरट्यांची हिंमत वाढतच चालली आहे.मुरूम गौण खनिज चोरी करणाऱ्यांकडे जेसीबी, कृषी प्रयोजनार्थ घेतलेले ट्रॅक्टर यांची फार मोठी यंत्रणा असल्याने शहरातील तसेच तालुक्यातील मोठ्या ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी  टोळ्या सक्रिय आहेत. विशेष म्हणजे जे मुरूम चोरतात.ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत.अश्यातच सिटी आणि अर्बन क्षेत्रातील अवैध मुरूम चोरटे ‘चोरीला मामला अन् मुरुमाचा ट्रॅक्टर एकझॅक्ट लोकेशनवर थांबला’ असे करून विविध ठिकाणची जागा पोखरू लागले आहेत. असे कृत्य करणाऱ्यांकडून अनेकांचे हात ओले होत असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात नाही,तर मोठ्या आवाजात सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!