Sunday, July 19, 2026
Homeभंडारादोघांना सरकारी नोकरी तर एकाला पेट्रोल पंपाच्या डीलरशिपचे आमिष... - ब्रम्हपुरीची जोडी...

दोघांना सरकारी नोकरी तर एकाला पेट्रोल पंपाच्या डीलरशिपचे आमिष… – ब्रम्हपुरीची जोडी ६५ लाखाचा चुना लावून फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आजकाल झटपट पैसे कमविण्याचे नवनवीन फंडे सुरू झाले आहेत.सायबर चोरटे ऑनलाईन फसवणूक करून पैसे कमवू लागलेत,तर कुणी एखाद्याच्या चुट्टीवरून हात फिरवून वा एखादे आमिष दाखवून गंडा घालू लागलेत.मात्र,शॉर्टकटने कमविलेला पैसा हा चिरकाल टिकणारा नसतोच,हेही तितकेच खरे आहे.कारण,ज्यावेळी एखादा व्यक्ती घाम गाळून पैसा कमवतो व त्याच्या कमवलेल्या पैस्यावर कुणी डोळा घालत असेल तर अश्या व्यक्तीची हाय लागून वाटोळे होत असते.अश्याच प्रकारे ब्रम्हपुरी शहरातील जोडी म्हणजेच पती-पत्नीने मिळून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर शहरातील तिघांना वेगवेगळे आमिष दाखवून तब्बल ६५ लाख १४ हजार रुपयांचा गंडा घालून फरार झाले आहेत. तिघांनाही ज्यावेळी कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.प्रकरणी तिघांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.रोशनी नाकतोडे वय २९ वर्षे आणि रोमल नाकतोडे वय ३७ वर्षे,दोघेही विदर्भ कॉलनी, मालडोंगरी रोड,ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.१ एप्रिल २०२२ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत रोशनी आणि रोमल यांनी लाखांदुरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील शिवनगरी लेआउट येथे राहणारे रूपेश गावतुरे वय ४६ वर्षे यांना पेट्रोल पंपची डीलरशिप देतो,असे सांगून ५३ लाख २८ हजार ८३७ रुपयांचा गंडा घातला.तसेच रूपेश यांचा मेहुणा नितेश गुरनुले हा देखील या दाम्पत्याच्या संपर्कात आला.त्यालाही सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली थाप मारून त्याच्याकडूनही ५३ हजार २८९ रुपये घेतले.एवढेच नाही तर,समीर ब्राम्हणकर यालाही ग्रामसेवकाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने ११ लाख ३२ हजार रुपयांनी गंडा घातला.दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ना पेट्रोल पंप मिळाला; ना नितेश आणि समीरला नोकरी मिळाली.  एवढेच नाही तर,रक्कमही परत दिली नाही. एकाच शहरातील तिघांना लाखोंचा गंडा घालणारी ही जोडी चालाख आहे.आपले वरपर्यंत संबंध असल्याचे भासवून आणि गोड बोलून या पती-पत्नीने सलग दोन वर्षांच्या काळात पैसे उकळले.मात्र,त्यांच्या चालाखीमुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षातच आले नाही.पोलिसांनी त्यांच्या पत्त्यावर जाऊन ब्रम्हपुरीत शोध घेतला,मात्र ते पसार झाले आहेत.प्रकरणी तिघांनीही लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!