- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एखादी तरुणी किंवा एखाद्या महिलेचे एखाद्यावर जेव्हा प्रेम जडते,अश्यावेळी आपल्याला ज्यांनी काबाळकष्ट करून,स्वतः फाटकी-तुटकी वेशभूषा परिधान करून,कसलीही कमतरता न भासू देता लहानाचे मोठे केलेत; अश्यांना विसरून चार दिवसांच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात व आई-वडिलांना दुरावली जातात.तरीही आई-वडील आपल्या मुलांनी काहीही केलं तरी विसरून जातात व जवळीकता साधण्याचा प्रयत्न करून आपली मुले सुखी रहावीत, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत असतात.अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात असाच काहीसा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सुरुवातील प्रेमाच्या आणाभाका टाकत दोघांनीही पळून जाऊन लग्न केले.लग्नानंतर दोन मुले झालीत.सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागलेल्या पत्नीला बाह्य महिलेशी प्रेमसंबंधाची भनक लागताच ती मानसिक तणावात गेली आणि गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.सदरची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या जयनगर येथे उघडकीस आली.संगीता श्रीनिवास सरकार वय ३४ वर्षे, रा.विक्रमपूर, ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,
असे गळफास घेऊन जीवनयात्रा संपाविलेल्या महिलेचे नाव आहे.
दहा वर्षापूर्वी विक्रमपूर येथील श्रीनिवास गिरेन सरकार वय ३४ वर्षे याने संगीताला फूस लावून पळवून नेले होते.याअंतर्गत चामोर्शी पोलिस ठाण्यात संगीताचे वडील गणेश मंडल यांनी तक्रार दाखल केली होती.दरम्यान, फरार असलेल्या श्रीनिवासने संगीताशी विवाह केला. त्यांना दोन मुलेही झाली.अशातच पळवून नेल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चामोर्शी पोलिसांनी श्रीनिवासला अटक करीत कारागृहात रवानगी केली होती.त्यामुळे संगीता ही दोन मुलांसह विक्रमपूर येथील श्रीनिवास सरकार यांचे घरीच वास्तव्याने राहत होती.चार ते पाच महिन्यांपूर्वी श्रीनिवासची जामिनावर सुटका झाल्याने तो घरी परतला होता.तद्नंतर श्रीनिवास हा कामानिमित्त पत्नी व दोन मुलांसह एटापल्ली येथे राहत होता. यादरम्यान,त्याचे एटापल्लीतील एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले.यावरूनच पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होऊ लागले.त्यामुळे संगीता वडिलांकडे गेली. ती नेहमीच मानसिक तणावात राहत होती.बुधवारी १४ मे च्या रात्री वडील गणेश मंडल जेवण करून घरीच झोपले असतांना ती घराबाहेर पडली आणि काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास गणेश मंडल यांचे भाऊ नारायण मंडल यांनी आष्टी मार्गावर आंब्याच्या झाडाला संगिताचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली.याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.वडील गणेश मंडल यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रीनिवास याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून केवळ तिच्या’ एंट्रीने घात केला अन् १५ वर्षापूर्वीच्या प्रेमाचा अखेर शेवट झाला.
- Advertisement -

