- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-काही भटक्या जमातीचे कुटूंबीय सोबत जीवनावश्यक साहित्य तथा वस्तू घेऊन आपल्या चारचाकी वाहनाने गावोगावी फिरून एखाद्या गावात व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा चालवीत असतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील भटक्या जमातीचे कुटूंबीय पिकअप वाहनाने गोंदिया जिल्ह्यातील देवरीवरून कुरखेडा मार्गे येत होते. दरम्यान,कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळील उतारावर समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,पिकअप वाहनातील एकजण जागीच ठार झाला.तर तीन वर्षीय बालकासह महिला गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी घडली.अपघातात किशोर भोसीलाल सोनवाने वय ४५ वर्षे,रा.सालई खुर्द, ता.मोहाडी,जि.भंडारा असे जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर ३ वर्षीय ईश्वर सोनवाने व ४८ वर्षीय योगिता सोनवाने असे गंभीर जखमींची नावे आहेत.घटनेनंतर जखमींसह मृताला तात्काळ रुग्णवाहिकने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.जखमींवर उपचार सुरू असून,मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलिसांनी सुरू केला असून अज्ञात ट्रकचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- Advertisement -

