- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे काल,गुरुवार १५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यानुसार काल दुपारच्या सुमारास जयस्वाल यांचे आरमोरी शहरात आगमन झाले व त्यांनी अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.प्रसंगी भाजपाचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग पदाधिकारी कैलास बगमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांची प्रत्यक्ष भेट घेत गडचिरोली जिल्ह्यातील बोगस अल्पसंख्यांक दर्जा,शालार्थ आयडी,अपंग प्रमाणपत्र तसेच चौदावा आयोग अनियमितता संदर्भात चर्चा करून निवेदनाद्वारे तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीत साईनाथ अद्दलवार(मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी ) यांची सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती तसेच शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.तसेच विश्वशांती विद्यालय कुनघाडा(रै), विश्वशांती विद्यालय भेंडाळा ता.चामोर्शी येथील बोगस अल्पसंख्याक दर्जा व बोगस शालार्थ आयडी प्राप्त करून करण्यात आलेली शिक्षक भरती,त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधीत शिक्षक,शिक्षिका यांचे वर कारवाईची मागणी.तसेच
गट ग्रामपंचायत शिवराजपूर ता.देसाईगंज यांनी १४ वा वित्त आयोग योजने अंतर्गत केलेल्या कामांमध्ये अनियमितता करून शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यानुसार राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या संबंधीत तक्रारी लवकरच मार्गी लावून संबंधितावर योग्य ती कारवाई करू,अशी ग्वाही दिल्याचे भाजपाचे पदाधिकारी कैलास बगमारे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
- Advertisement -

