Sunday, August 16, 2026
Homeचंद्रपूरयेत्या १९ मे रोजी मोखाळा येथे बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापणा तथा संघमित्रा...

येत्या १९ मे रोजी मोखाळा येथे बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापणा तथा संघमित्रा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील बौद्ध समाज मोखाळा (व्याहाड) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना संघमित्रा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा येत्या सोमवार १९ मे रोजी पुज्य भदंन्त ज्ञानज्योती महाथेरो व भिख्खू संघ यांच्या हस्ते पार पडणार आहे.तसेच दुपारच्या सुमारास  धम्मदेशना व मार्गदर्शन होणार असून सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टिवार तर सह उदघाटक म्हणुन माजी खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र हे असणार असुन दिप प्रज्वलन ॲड.राम मेश्राम माजी जि.प.सदस्य गडचिरोली,सरपंच प्रणिताताई म्हशाखेत्री,भाजपाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांचे हस्ते होणार आहे.सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष गोपाल रायपूरे,शेडयुल्ट कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे,रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,सामाजिक कार्यकर्ता प्रा.श्याम रामटेके,रिपाई महिला आघाडी प्रमुख ॲड.प्रियंका चव्हाण चंद्रपूर, सामाजिक कार्यकर्ता प्रा.अपेक्षा पिंपळे चंद्रपूर आदि लाभणार आहेत.रात्री ९ वाजता समतेचं विद्रोही वादळ,गायक उपेंद्र वनकर यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमाचे उदघाटक संचालक संदिपभाऊ गडुमवार तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि.प.सदस्य दिनेश चिटनुरवार,माजी बांधकाम सभापती संतोष तंगड पल्लीवार, निखिलभाऊ सुरमवार, उदय गडकरी सावली हे राहणार आहेत.सदर कार्यक्रमास बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष टिकेश गेडाम, उपाध्यक्ष राहुल चुनारकर,सचिव राजेश थेरकर तर कोषाध्यक्ष विनायक दुधे मोखाळा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!