Sunday, October 4, 2026
Homeमुंबईतुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींबाबत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे ‘विमल’ करारांची मागणी करण्यात आली आहे.त्यानुसार,बॉलिवूडचे कलाकार अजय देवगण,शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या बड्या अभिनेत्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.विशेष म्हणजे, तिघांनाही स्पष्टीकरण देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्याचबरोबर,विहित मुदतीत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; अन्यथा कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.त्यांच्याकडून प्रचार करार,मोहिमेचा तपशील, मानधनाचे तपशील आणि योग्य ती खबरदारी घेतल्याच्या पुराव्यांच्या संपूर्ण प्रतींची मागणी केली आहे. आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई कां केली जाऊ नये? याचे लेखी स्पष्टीकरण पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचा अंतिम इशारा या कलाकारांना देण्यात आला आहे.संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार,दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी १० लाख रुपये ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि संबंधित कलाकारांवर तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यास बंदी घातली जाऊ शकते.तिन्ही अभिनेत्यांवर आरोप आहे की,त्यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ ब्रँडचे नाव वापरून इलायचीच्या नावाखाली अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.या कलाकारांना संबंधित मोहिमेतील सहभाग त्वरित थांबवण्याचे आणि जाहिरातीशी संबंधित सर्व प्रचार,साहित्य त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व वेबसाइट्सवरून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यावर अद्याप बॉलिवूड कलाकारांनी चुप्पी साधली असल्याने येत्या काळातील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!