Monday, September 21, 2026
Homeचंद्रपूर'त्या' वाघासाठी आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे डिजिटल नजर..

‘त्या’ वाघासाठी आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे डिजिटल नजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून ५५ वर्षीय शेतकरी रमेश जयराम काशीवार यांना ठार केले होते.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते.दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.ऐन शेतीकामांच्या हंगामात वाघाची दहशत लक्षात घेता वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५ वन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक,तसेच वाघाची भ्रमंती नेमकी कोणत्या ठिकाणी व कोणत्या परिसरात आहे; यासाठी जंगल परिसर व आजूबाजूच्या परिसरात तब्बल आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास डिजिटल नजर ठेवून माहिती घेतली जात आहे.दरम्यान,नागभीड प्रादेशिक वन विभागाच्या आरएफओ भारती बगमारे यांनी नागरिकांना जंगल परिसरात तसेच लगतच्या परिसरात एकटे न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!