- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुका ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ ची कार्यकारिणी आज,रविवार १६ फेब्रुवारीला व्हॉईस ऑफ मिडीयाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुहुमवार यांच्या सुचनेवरून,जिल्हा सचिव विलास ढोरे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली.यात व्हॉईस ऑफ मिडीयाच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी राजरतन मेश्राम तर सचिवपदी इलियास खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या सुचनेनुसार, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुहुमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील बारा ही तालुक्यातील नव्याने कार्यकारिणी गठित करण्यात येणार असून सर्वप्रथम चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.त्यानुसार आज रविवारी देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.गठीत कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी राजरतन मेश्राम तर सचिवपदी इलियास खान पठाण यांची निवड होताच,अध्यक्ष सचिवांनी सहकार्यकारिणी गठित केली.यात व्हॉईस ऑफ मिडीयाच्या देसाईगंज तालुका कार्याध्यक्षपदी प्रा.दिलीप कहूरके यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी अरूण राजगीरे, संघटक प्रकाशचंद्र दुबे,सहसचिव रविंद्र कुथे, कोषाध्यक्ष महेश सचदेव,कार्यवाहक अरविंद घुटके, प्रसिद्धी प्रमुख पंकज चहांदे,मार्गदर्शक म्हणून जेष्ट पत्रकार सेवा निवृत्त मुख्याध्यापक शामराव बारई तर सदस्य म्हणून शैलेश पोटवार,हेमंत दुनेदार,नासिर जुम्मन शेख,अब्दुल वहीद शेख,घनश्याम कोकाडे आदींची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सचिव विलास ढोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रसंगी पत्रकारांच्या समस्या तथा अडचणी व पत्रकार भवनाकरीता प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष,सचिवांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

