Sunday, May 3, 2026
Homeभंडाराबिबट्याची शिकार केल्याचे निष्पन्न न झाल्याने वृद्धाची निर्दोष सुटका..

बिबट्याची शिकार केल्याचे निष्पन्न न झाल्याने वृद्धाची निर्दोष सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पवनी वन परिक्षेत्रातील नागणगाव येथील शेत शिवारात सन २०१४ मध्ये मादी बिबट्याचे शव कुजलेल्या स्थितीत आढळून आल्यामुळे शिकार केल्याच्या संशयावरून पवनी येथील एका वृद्धाला अटक करण्यात आली होती.मात्र,तब्बल ११ वर्षानंतर गुन्हा सिद्ध होत नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
नागणगाव हे राखीव वन परिक्षेत्र असून, पवनी वन परिक्षेत्राच्या अंतर्गत येते.८ डिसेंबर २०१४ ला या शेत शिवारात एका मादी बिबट्याचे शव कुजलेल्या अवस्थेत आढळले.याची माहिती मिळताच वन विभागाने बिबट्याची शिकार करण्यात आली असावी,अशा संशयावरून शेळ्या चारणारे परमानंद वातू लांजेवार या ७० वर्षाच्या वृद्धाला वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार अटक केली होती.परंतु,या आरोपीकडून कोणतेही शिकार करण्याचे मृत बिबट्याचे जैविक अवयव रासायनिक परीक्षणासाठी हैदराबाद येथील कोशिकीय व आण्विक जीव विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.परंतु,बिबट्याची शिकार झाल्याचे परीक्षणात निष्पन्न झाले नाही.बिबट्याच्या शिकार प्रकरणात नेमका तपास कोणी केला व पंचनामे कोणी केले,हे देखील अस्पष्ट होते. शवविच्छेदन करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल सुसंगत नव्हता व त्यांची साक्ष न्यायालयात घेण्यात आली नाही.या कारणांमुळे या आरोपीला पवनी न्यायालयाने दोषमुक्त केले.आरोपीच्या वतीने ॲड.महेंद्र गोस्वामी यांनी बाजू मांडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!