Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीदागिने लंपास करणाऱ्या चोरट्या महिलेचे आरमोरी पोलिसांकडून स्केच छायाचित्र जारी

दागिने लंपास करणाऱ्या चोरट्या महिलेचे आरमोरी पोलिसांकडून स्केच छायाचित्र जारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहराच्या नवीन बसस्थानकावर मागील आठवड्यात एका अज्ञात चोरट्या महिलेने गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या पर्स मधून तब्बल ८ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी अज्ञात महीलेविरोधात आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित महिला आरोपीचा स्केच छायाचित्र जारी केला आहे.घटनेच्या वेळी संशयित महिला ही पाच फूट उंच,सावळ्या रंगाची,जिन्स पॅन्ट व टॉप परिधान केलेली होती,तसेच तिच्या चेहऱ्यावर मुरूम असल्याची माहिती फिर्यादी महिलांनी पोलिसांना दिली आहे.सदर आरोपी महिला कुठेही आढळून आल्यास तात्काळ आरमोरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. माहितीनुसार,आरमोरी येथील रहिवासी लता वामन जुवारे ही आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकावर ब्रम्हपुरीला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती.तर नागपूर येथील रहिवासी २९ वर्षीय निधी रूपेश शेंडे ही नागपूरला जाण्यासाठी आरमोरी येथे बसची वाट पाहत होती.यादरम्यान अज्ञात महिला आरोपीने लता जुवारे यांचे ५ लाख ८८ हजार किंमतीचे ८४ ग्रॅम दागिने लंपास केले,तर निधी शेंडे यांच्या बॅगेतून २ लाख ७६ हजार ५०० रुपये किंमतीचे ३९.०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.प्रकरणी आरमोरी पोलिसांकडून आरोपी महिलेचा तपास सुरू होता.मात्र,आरोपी महिलेचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर पोलिसांना आरोपीचे स्केच छायाचित्र जारी करावे लागले असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!