Saturday, July 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजेवढे नगरसेवक तेवढेच अर्ज; पूर्णच्या पूर्णच बिनविरोध निवडून..

जेवढे नगरसेवक तेवढेच अर्ज; पूर्णच्या पूर्णच बिनविरोध निवडून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन येत्या २ डिसेंबरला निवडणूक तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे.आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.अश्यातच सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायतीत मोठी घडमोड घडली असून मतमोजणी होऊ निकाल जाहीर होण्यापूर्वीच अनगर नगरपंचायतीचा निकाल लागला आहे.विशेष म्हणजे, आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.पण,या मुदतीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.त्यातच,अनगर नगरपंचायतीत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली असली तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र भाजप व अजित पवार गटाच्या उमेदवारात लढत होणार आहे.भाजपने ही निवडणूकही बिनविरोध करण्यासाठी ताकद लावली होती.पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आज पहाटेच्या सुमारास नगरपंचायत गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामुळे भाजपच्या बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या प्रयत्नांना सुरूंग लागला आहे.महत्वाचे म्हणजे,भाजप नेते राजन पाटील यांनी मोठी खेळी खेळल्याने १७ पैकी १७ उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!