- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
उसेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकताच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रसंगी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेट वस्तूंसह पुस्तके तसेच माजी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. विविध कार्यक्रम तसेच जुन्या आठवणीने माजी विद्यार्थी भारावून गेले होते.सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून पत्रकार कैलास बगमारे,अध्यक्ष म्हणून बंडू दोनाडकर माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल बोरकर,पोलीस शुभम दोनाडकर,दिनकर कांबडी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उसेगांव, ग्रामपंचायत सदस्य दीपक प्रधान,शिल्पा डोंगरावर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,संजय बगमारे,नकुल नाकाडे नाकाडे उद्योग समूह,नानाजी सयाम अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती,राजहंस बोदले उपाध्यक्ष वन व्यवस्थापन समिती,मनोज चौधरी,मेघराज कांबडी, प्रशांत बोरकर,भूषण बोदले,ओमप्रकाश सोनवणे, शिक्षक अमोल पडोळे यांचे सह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका माडूलवर यांनी केले,तर प्रास्ताविक शिक्षिका सातेवार आणि आभार शिक्षिका धानोरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका निशा गायकवाड,सोनकुसरे, पर्वते,मंदा बगमारे,वर्षा कापगते,गीता नाकाडे यांनी सहकार्य केले.
- Advertisement -

