Sunday, July 12, 2026
Homeदेसाईगंजअखेर देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने उछल्ला सिक्का; वनिता नाकतोडेंना उमेदवारी.. - आज...

अखेर देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने उछल्ला सिक्का; वनिता नाकतोडेंना उमेदवारी.. – आज आमदार मसरामांच्या नेतृत्वात काँग्रेसची भव्य नामांकन रॅली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी  देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने सिक्का उछचत वनिता अशोक नाकतोडे यांना उमेदवारी जाहीर करून आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.तसेच नगरसेवक पदासाठी सर्व उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.रॅलीत पक्षाचे अधिकृत चिन्ह हाताचा पंजा असलेले बॅनर,तिरंगी झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.आज सकाळच्या सुमारास हटवार मंगल कार्यालयापासून निघालेली भव्य रॅली नगर परिषद कार्यालयापर्यंत उत्साहात पार पडली.रॅलीत आमदार मसराम यांचेसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी,महिला वर्ग,युवक,कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. रॅलीद्वारे काँग्रेसने जनतेसमोर संघटनेची ताकद,एकजूट आणि विकासाची वचनबद्धता प्रदर्शित केली.या प्रसंगी आमदार मसराम यांनी नगर परिषद निवडणुकीत जनतेच्या विश्वासावर यश संपादन करून देसाईगंजच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!