Wednesday, October 7, 2026
Homeदेसाईगंजकुरूड-कोंढाळा बिटातील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघात.. -नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवले; मृत्यूशी झुंज...

कुरूड-कोंढाळा बिटातील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघात.. -नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवले; मृत्यूशी झुंज सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या 
कुरूड-कोंढाळा बिटातील ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरसकोल्हे यांच्या दुचाकीचा अपघात होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले.त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना प्रथम ब्रम्हपुरी व त्यानंतर पुढील उपचारार्थ नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून,त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.सदरचा अपघात हा त्यांच्या दुचाकीला रानडुकराने दिलेल्या धडकेने घडल्याची माहिती आहे.
संतोष मरसकोल्हे हे देसाईगंज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे कुरूड,कोंढाळा,शिवराजपुर, उसेगाव,तुळशी व कोकडी इत्यादी गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे.अपघात घडण्यापूर्वी ते आरमोरीत राहत असल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यातील शुक्रवारची रात्रपाळी संपवून काल शनिवारच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत जात होते.दरम्यान,आरमोरी मार्गावर अचानकपणे समोर आलेल्या रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच मरसकोल्हे हे डोक्याच्या भारावर खाली कोसळले. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ ब्रम्हपुरीच्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले.विशेष म्हणजे,कोंढाळा ते आरमोरी मार्ग जंगल परिसराने वेढलेला असल्याने या मार्गावरून नेहमीच जंगली प्राण्यांची भ्रमंती सुरू असते.त्यामुळे वाहने चालवतांना काळजीपूर्वक आणि हळू चालवणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!