Monday, September 21, 2026
Homeआरमोरीडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष हाच खरा मुळ पक्ष- प्रा.मुनिश्वर...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष हाच खरा मुळ पक्ष- प्रा.मुनिश्वर बोरकर यांचे प्रतिपादन- आरमोरी रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष हाच खरा मुळ पक्ष आहे.बाकी रिपाई व्यतिरिक्त इतर पक्ष काही कामाचे नाही.आंबेडकरी जनता रिपाईच्या मागे आहे.लोकसभा निवडणुका लक्षात घेता रिपाईचा झंझावती दौरा सुरु झाला असुन चिमुर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात सभा- बैठका घेण्याचा निर्धार प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून रिपब्लिकन पार्टी आरमोरी तालुक्याची बैठक चंद्रपूर रिपाई जिल्हाध्यक्ष गोपाल रामपूरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,उपाध्यक्ष मारोती भैसारे,सोनू साखरे , कुरखेडा चे मानिक डोंगरे,टि.एम.खोबागडे आदि उपस्थित होते.याप्रसंगी गोपाल रायपुरे म्हणाले की, जातीयवादी शक्तीला बाजुला सारून जो पक्ष रिपाईला सन्मानाने वागणुक देइल त्या पक्षाला आम्ही सहकार्य करू; आज देशात बेरोजगारी,बेकारी तसेच भाववाढ फोफावत असुन संविधान वाचविण्यासाठी एक लढाई लढण्याची गरज आहे.याप्रसंगी मुरलीधर भानाकर टि .एम. खोब्रागडे , सोनू साखरे , पत्रकार हर्षद साखरे , रुषी सहारे , भुवण बोरकर ,अशोक शामकुळे , चुन्नीलाल मोटघरे,दिनेश बनकर,मानिक डोंगरे , सत्यवान रामटेके आदिची समायोचित भाषणे झालीत.कार्यकमाचे संचालन रिपाई सचिव शामराव सहारे व प्रास्ताविक आरमोरी तालुका प्रमुख राजेंद्र ठवरे तर आभार प्रशांत मेश्राम यांनी केले.बैठकीला विलास सेलोटे , देवकुमार गेडाम , युवराज धंदरे , राजाराम लोखंडे , अशोक बावणे , नानाजी मेश्राम , प्रकाश बारसागडे , योगेश वानखेडे , चागदेव मेश्राम , वासुदेव लोणारे , देवेंद्र बोदेले , लोकमित्र रामटेके , देवेंद्र मेश्राम , सहीत तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!